कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टपासून ? महापालिकेने घेतला 'हा' निर्णय

 Corona
Coronasakal media

मुंबई : कोविडची तिसरी लाट (corona third wave) ऑगस्ट (august months) अखेर पासून सुरु होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महानगरपालिकेने (BMC) 12 ऑगस्ट पासून जंम्बो कोविड केंद्र (jumbo corona center) सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्या टप्प्याने जशी गरज पडेल त्यानुसारही केंद्र सुरु करण्यात येणार आहे. (corona third wave-august months-bmc-jumbo corona center-nss91)

महानगर पालिकेने कोविडच्या तीसऱ्या लाटेसाठी 30 हजार बेड्‌स तयार करुन ठेवले आहेत.त्यातील काही ठिकाणी कामे सुरु आहेत.सध्या रुग्ण नसल्याने कोविड केंद्र बंद आहेत.पण,आता पुन्हा कोविड केंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या.संपुर्ण केंद्र एकाच वेळी सुरु करण्यात येणार नाही.मात्र,12 ऑगस्ट पासून टप्प्या टप्प्याने ही केंद्र सुरु करण्यात येणार आहे.असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पालिकेची अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

 Corona
अतिवृष्टीमुळे कागदपत्रे गहाळ झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचा दिलासा

मुंबईत जून महिन्यात आलेल्या तौक्ते वादळादरम्यान बांद्रा बीकेसी, दहिसर, मुलुंड, भायखळा येथील कोविड सेंटर बंद करण्यात आले होते. त्याची दुरुस्ती करून ही सेंटर सज्ज ठेवण्यात आली आहेत.त्याच बरोबर कांजूरमार्ग,मालाड आणि भायखळाही येथेही जंम्बो कोविड केंद्र सुरु होणार आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जम्बो कोविड सेंटर सुरू करताना 70 टक्के ऑक्‍सिजन बेड, 10 टक्के आयसीयू उपलब्ध करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.

त्यामुळे जम्बो सेंटरमध्ये लहान मुलांसाठी वॉर्ड असेल. पालकांना या ठिकाणी थांबण्याचीही व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडुन सांगण्यात आले. पालिकेने कोविड केंद्रातील अतिदक्षता विभागाच्या नियोजनासाठी खासगी संस्थांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे.मात्र,यांचे काम तत्काळ सुरु करण्यात येणार नाही.जर,गरज पडल्यास या संस्थांवर जबाबदारी देण्यात येईल असेही सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com