'असा' असेल होम क्वारंटाईनचा शिक्का, पाहा फोटो...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

मुंबई - कोरोनाच्या संसर्गामुळे महाराष्ट्रात आणि देशभरात खबरदारी बाळगली जातेय. आज दिनांक १६ मार्च संध्याकाळी सहा वाजेपर्यंत महाराष्ट्रात कोरोनाच्या ३९ पॉझिटिव्ह केसेस आढळल्यात. अशात महाराष्ट्र सरकारकडून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. अशात सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कोरोना रुग्णांना आता ३ विभागात विभागण्यात येणार आहे. यामध्ये सर्व संशयित आणि कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे A, B आणि C असे वॉर्ड करण्यात येणार आहेत. अशात आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रशासनाकडून ज्यांना घरातच क्वारंटाईन करणार येणार आहे त्यांना हातावर एक शिक्का मारण्यात येणार आहे. 

मोठी बातमी - जाणून घ्या 'कधी येणार' कोरोनावरील लस; आजपासून चाचण्या सुरु...

या शिक्क्याच्या माध्यमातून ज्यांना घरात क्वारंटाईन करण्यात येणार आहे अशांची ओळख नागरिकांना पटावी आणि सतर्कता वाढावी म्हणून त्यांच्या हातावर हा शिक्का मारण्यात येणार आहे. अशात हा शिक्का कसा असेल याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. 

असा असेल होम क्वारंटाईन शिक्का : 

No photo description available.

या शिक्क्यावर होम क्वारंटाईन असं लिहिलंय त्याचसोबत 'प्राऊड टू प्रोटेक्ट मुंबईकर'  असं देखील लिहिलेलं असणार आहे. दरम्यान, ज्या तीन विभागात संशयित आणि कोरोना पॉझिटिव्ह केसेसना विभागण्यात येणार आहे त्या अशा असतील. 

मोठी बातमी - कोणत्या वातावरणात कोरोना व्हायरस बनतो राक्षस?

काय आहे A कॅटेगरी : या कॅटेगरीत ज्यांना कोरोना आहे असं निदर्शनास आलंय त्यांना A कॅटेगरीत ठेवण्यात येणार आहे.

काय आहे B कॅटेगरी : वय वर्ष साठ वरील वयोवृद्ध आणि डायबिटीस किंवा हायपर टेन्शन असणाऱ्यांना आणि कोरोना संशयित लक्षणं असणाऱ्या व्यक्तींना B कॅटेगरीमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार आहे 

काय आहे C कॅटेगरी : C कॅटेगरीमध्ये तरुणांना अगदी कमी लक्षणं आहेत अशाना ठेवण्यात येणार आहे.

corona update check how home quarantine stamp is going to be

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona update check how home quarantine stamp is going to be