Corona Vaccination:लसीकरणासाठी निवडलेले 50% लाभार्थी अनुपस्थित

मिलिंद तांबे
Sunday, 17 January 2021

कोरोना लसीकरणासाठी निवडले गेलेले 50% लाभार्थी अनुपस्थित राहीले, त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशीच लसीकरणाचं ठरलेलं लक्ष्य पूर्ण झालं नाही.

मुंबई: कोरोना लसीकरणासाठी निवडले गेलेले 50% लाभार्थी अनुपस्थित राहीले, त्यामुळे लसीकरणाच्या पहिल्या दिवशीच लसीकरणाचं ठरलेलं लक्ष्य पूर्ण झालं नाही.
लसीकरणासाठी कोविन ऍपवर माहिती भरून मेसेज पाठवले आवश्यक होते. मात्र कोविन ऍपवरुन बरेच जणांना मेसेज मिळाले नाहीत. त्यामुळे, लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली.

कोविन ऍप वेळेवर सुरुही झाले नाही. लसीकरणासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा लसीकरण उशीरा सुरु झालं. दुपारी 12 नंतर लसीकरणाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बीकेसी कोविड सेंटरला पहिली लस दिली गेली त्याची वेळ पुढे ढकलण्यात आली होती.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या सर्व गोष्टींचा फटका आजच्या लसीकरणाचुरा कामाला बसला. आज दिवस भरात एकूण 10 लसीकरण केंद्रांवर 4000 जणांना लस देण्याचे निश्चित झाले होते. मात्र, प्रत्यक्ष 1 हजार 926 जणांनाच लस टोचली गेली.

हेही वाचा- ठाणे जिल्ह्यात तसेच पालिका क्षेत्रातील शाळा पुढील आदेशापर्यंत बंद

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Corona Vaccination 50 Percentage beneficiaries selected vaccination absent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Vaccination 50 Percentage beneficiaries selected vaccination absent