esakal | Corona vaccination : शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर आज लसीकरण बंद
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

Corona vaccination : शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर आज लसीकरण बंद!

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : पुरेशा लस साठ्याअभावी (less Vaccines) बुधवारी 21जुलै 2021 रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर (Corona Vaccination) लसीकरण बंद राहणार आहे. कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा मुंबईला (Mumbai)उपलब्ध होत नाही. त्यामुळे, मंगळवारी ही बर्‍याच ठिकाणी लसीकरण बंद होते. फक्त 58 केंद्रांवरच कोविड लसीकरण सुरू होते. पण, पालिकेकडून(BMC) मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी पूर्णपणे लसीकरण बंद राहणार आहे. (Corona vaccination closed on today Wednesday says BMC-nss91)

हेही वाचा: Offline Exam: पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख ठरली

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्यानुसार, योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

loading image