मोठी बातमी - महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी, मुंबईतील कस्तुरबात ६५ वर्षीय नागरिकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 मार्च 2020

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालाय. ६५ वर्षीय पुरुषाला खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने २३ मार्च रोजी त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुंबई -  मुंबईत कोरोनामुळे आणखी एका नागरिकाचा मृत्यू झालाय. ६५ वर्षीय पुरुषाला खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्याने २३ मार्च रोजी त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्ती UAE मध्ये प्रवास करून १५ तारखेला अहमदाबादमध्ये आली होती. २० तारखेला सदर व्यक्ती मुंबईत आला होता.

दरम्यान मृत्यू झालेल्या नागरिकाला उच्च रक्तदाबाद आणि अनियंत्रित डायबिटीस असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. काल म्हणजे २३ मार्च रोजी संध्याकाळी या इसमाचा मृत्यू झालाय. या इसमाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ४ वर गेलाय. बृहन्मुंबई महानगरपालिकेने याबाबत एक पत्रक जरी केलंय आणि याबाबत माध्यमांना माहिती दिलीये.  

COVID19 : कोरोनाबाबत नसत्या अफवा पसरावणाऱ्यांच्या तोंडावर मारा 'ही' बातमी
 

Image may contain: text that says "बृहन्मुंबई महानगरपालिका COVID-19 वृतपत्र निवेदन कोविड -१९ मृत्यू अहवाल दिनांक २४ .२०२० ६५ वर्षीय व्यक्तीस ताप, खोकला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे दिनांक २३.०३.२०२० रोजी रुग्णालयात आणण्यात आले. सदर व्यक्ती युएई येथे प्रवास करून करून दिनांक १५.०३.२०२० रोजी आली आणि त्यानंतर दिनांक २०.०३.२०२० रोजी मुंबईत आली, या व्यक्तीस तसेच अनियंत्रित मधुमेहाचा त्रास होता.रुग्ण गंभीर असल्याकारणाने उपचारा दरम्यान त्यांचा २३.०३.२०२० च्या संध्याकाळी मृत्यू झाला. त्यांचे कोविड-१९ चाचणीचे positive निदान झाले. उपकार्यकारी आरोग्य अधिकारी (प्र) (साथरोग नियंत्रण कक्ष)"

COVID19  मुंबईतून आली कोरोनासंदर्भात अत्यंत दिलासादायक बातमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव काल महाराष्ट्रासाठी अत्यंत मोठा निर्णय घेतलाय फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी आणि माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलम १४४ नंतर महाराष्ट्रात आता संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. या सोबतच महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांच्या सीमा देखील सील करण्यात आल्यात 

corona virus 4th death of covid19 registered in mumbai at kasturba hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus 4th death of covid19 registered in mumbai at kasturba hospital