मुंबई - कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी सर्व स्तरातून उपाययोजना केल्या जात असताना एक चिंतेची बातमी समोर येत आहे. राज्यात लोकांनी लॉक डाऊनचे पालन करावे म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलिस खात्यातील 531 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत 51 पोलिस अधिकारी आणि 480 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
मृत्यूचे प्रमाण वाढते -
आतापर्यंत मुंबईत 3 पोलिसांचा तर पुण्यात 1 सोलापुरात 1 अशा 5 पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 39 पोलीस हे बरे झाले असून यात 8 पोलिस अधिकारी आणि 31 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. एकूण 487 पोलिसांवर सध्या उपचार सुरू असून यात 43 पोलीस अधिकारी आणि 444 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
राज्यातील नागरिक लॉकडाऊन गंभीरतेने घेत नसल्याने पोलिसही आता हतबल झाले आहेत. लोकांनी घरी राहावं यासाठी पोलिस रस्त्यावर उतरले आहेत. पण आता ते ही कोरोनाच्या विळख्यात सापडत असुन मोठ्या प्रमाणात पोलिस ही कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत.
531 police detected positive read full story here
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.