esakal | म्हणून चाचण्या कमी, अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले कारण

बोलून बातमी शोधा

corona testing
म्हणून चाचण्या कमी, अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले कारण
sakal_logo
By
समीर सुर्वे -सकाळ वृत्तसेवा

मुंबई: कॅम्प लावून तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांच्या कोविड चाचण्या करण्यात येत होत्या.आता हे प्रमाण कमी झाल्याने चाचण्याची संख्या कमी झाली आहे, असा दावा आज महानगर पालिकेचे अतिरिक्त सुरेश काकाणी यांनी केला. कोविडच्या रोजच्या चाचण्याची संख्या 50 हजारावरुन 30-35 हजारांवर आल्या आहेत.

राज्यात निर्बंध लागू होण्यापूर्वी महानगर पालिकेनं मॉलमध्ये कोविड चाचणी करुन प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. तसेच महानगर पालिकेच्या काही प्रभागात कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांच्या चाचण्या होत होत्या. त्याचबरोबर बाजार, गर्दीच्या ठिकाणीही कोविड चाचण्याचे कॅम्प लावले जात होते. यामुळे मुंबईतील रोजच्या चाचण्याची संख्या 50 हजारापर्यंत पोहचली होती. मात्र आता चाचण्यांची संख्या 30 ते 35 हजारांच्या आता आल्याने पालिकेच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केला जात होता. मात्र कॅम्प लावून आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवाशांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी झाल्याने चाचण्याची संख्या कमी झाली आहे, असे काकाणी यांनी सांगितले.

हेही वाचा: बेड मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला अटक

पॉझिटिव्हीटी रेट कमी

चाचण्या कमी करुन रुग्णसंख्या कमी दाखविण्याचा आरोपही पालिकेवर केला जात आहे. या आरोपाचे खंडन करताना काकाणी म्हणाले, "मुंबईचा पॉझिटीव्हीटी रेटही कमी झाला आहे'. मुंबईत एप्रिल महिन्याच्या मधल्या काळात 100 चाचण्यामागे 25 ते 26 व्यक्ती बाधित असल्याचे आढळत होते. ते प्रमाण आता 12 ते 14 टक्‍क्‍यांच्या दरम्यान आले आहे. मुंबईतील मृत्यूदरही पूर्वी पेक्षा कमी असल्याचा दावा काकाणी यांनी केला.

(संपादन- पूजा विचारे)

corona virus less tests nowdays additional commissioner told reason