'या' सुपच्या सेवनामुळे कोरोना पसरला जगभरात, व्हिडीओ पाहाल तर अंगावर काटा येईल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

मुंबई - चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलंय. अशातच अमेरिका, जपान , दक्षिण कोरिया, ब्रिटन, मेक्सिकोमध्ये या व्हायरसचे शेकडो संशयित रुग्ण आढळून आले आहेत. भारतात कोरोनाचा एक रुग्ण आढळून आलाय. जगभरात या महाभयानक अशा कोरोना व्हायरसमुळे दहशत पसरली आहे. चीनमधून या कोरोना व्हायरसचा प्रसार झाला. चीनमधील वुहान शहरातील एका मच्छिमार्केटमधून याचा प्रसार झाल्याचं बोललं जातंय. या मार्केटमध्ये काय  काय मिळतं हे  वाचाल तर तुम्हालाही धक्का बसेल. या मार्केटमध्ये वटवाघुळ, साप, सरडे, लांडग्यांची पिल्लं, माकड, मांजरी, कुत्रे, मगर, बेडूक याचसोबत सर्व प्राणी आणि पक्षी मिळतात. 

हा व्हायरस वटवाघुळाच्या खाण्याने पसरला असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. अशात समोर आलेला एक व्हिडीओ अत्यंत किळसवाणा आणि सोबतच धक्कादायक आहे. या व्हिडिओमध्ये एक महिला चक्क वटवाघूळाचं सूप पिताना पाहायला मिळतेय. व्हायरल झालेल्या व्हिडिओत वटवाघुळ स्पष्ट दिसतंय. त्यामुळे चीनमध्ये वटवाघुळाचं सेवन केलं जातं हे स्पष्ट होतंय.

वुहान शहरात वटवाघुळांचा मोठा बाजार आहे. मोठ्या प्रमाणावर इथे वटवाघुळांचे सौदे चालतात. एका अहवालानुसार कोरोना व्हायरस सुरवातीला सापांमध्ये आढळून आला. त्यानंतर तो वटवाघुळांमध्ये पोहोचला आणि वटवाघुळांच्या सेवनाने हा व्हायरस माणसांमध्ये आल्याचं नमूद करण्यात आलंय.  

दरम्यान चीनमधून पसरणाऱ्या या कोरोना व्हायरसमधून जगभरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे. या व्हायरसची गंभीरता पाहता सर्व देशांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. भारतातील अनेक विद्यार्थी त्याचसोबत नागरिक वुहानमध्ये आहेत , त्यांना  देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वेळ आल्यास त्यांना एरलिफ्ट करण्याची तयारी देखील भारताकडून केयी गेलीये. या महाभयानक कोरोनावर सध्या अनेक डॉक्टर इलाज शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

corona virus spread due to having bat soup video goes viral on internet

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona virus spread due to having bat soup video goes viral on internet