कॉर्पोरेट मुंबईतही भरल्या पारंपरिक जत्रा, तुम्ही येताय ना ?

अनिश पाटील
Friday, 10 January 2020

मुंबई : 'कॉर्पोरेट' महानगरी मुंबईला महोत्सव आणि फनफेअर हे शब्द नवे नाहीत, पण या स्वप्ननगरीत दरवर्षी जत्राही भरतात, असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही. अस्सल गावपण टिकवणारी आणि परंपरा जपणारी जत्रा म्हणजे गाव-खेड्यांचे आकर्षण. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण. अगदी गावच्या मातीत नाही; परंतु गावच्या मातीची आठवण करून देणारा हा माहोल अनुभवायचा असेल तर मग चला वरळीतील गोल्फादेवीच्या नि प्रभादेवीच्या दर्शनाला अन्‌ त्यासोबत लुटा जत्रेचा आनंद!

मुंबई : 'कॉर्पोरेट' महानगरी मुंबईला महोत्सव आणि फनफेअर हे शब्द नवे नाहीत, पण या स्वप्ननगरीत दरवर्षी जत्राही भरतात, असे सांगितले तर विश्‍वास बसणार नाही. अस्सल गावपण टिकवणारी आणि परंपरा जपणारी जत्रा म्हणजे गाव-खेड्यांचे आकर्षण. ग्रामीण भागातील नागरिकांसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण. अगदी गावच्या मातीत नाही; परंतु गावच्या मातीची आठवण करून देणारा हा माहोल अनुभवायचा असेल तर मग चला वरळीतील गोल्फादेवीच्या नि प्रभादेवीच्या दर्शनाला अन्‌ त्यासोबत लुटा जत्रेचा आनंद!

गोल्फादेवीच्या जत्रेला लाखो भाविक सकाळपासून हजेरी लावतात आणि रात्रीही जत्रेचा आनंद लुटतात. प्रभादेवी व आसपासच्या परिसरातील नागरिक नववर्षाच्या पहिल्याच आठवडयात प्रभादेवीच्या दर्शन घेऊन वर्षाची सुरुवात करणार आहेत. विशेष म्हणजे शाकंभरी पौर्णिमेपासून राज्यात 23 ठिकाणी यात्रा भरतात.

हे माहितीये का ? - २०२० मध्ये 'या' सिनेमांचे येणार सिक्वल 

गेल्या काही वर्षांत मुंबापुरीने झपाट्याने कात टाकली. गिरण्यांची धुरांडी जाऊन टोलेजंग इमारती नि मॉल उभे राहिले. या टोलेजंग संस्कृतीतही अस्सल गावपण टिकविले ते वरळी गावाने. गावपण टिकविण्यासोबतच गावरान संस्कृतीशी नाळ सांगणाऱ्या यात्रा-जत्रांचे पारंपरिकपणही जोपासले, टिकवले, वाढवले अन्‌ फुलविले.

पौष महिन्याच्या शाकंभरी पौणिमेला शुक्रवारी (ता. 10) गोल्फादेवीची जत्रा आहे. ही यात्रा नागरिकांच्या प्रचंड गर्दीचे, अलोट प्रेमाचे नि पारंपरिकतेशी नाळ जोडणाऱ्या संस्कृतीचे दर्शन घडवते.

Image may contain: 3 people, people smiling, people standing

आदिमायेचे रूप

आदिमायेच्या अनेक रूपांपैकी गोल्फादेवी ही एक मानली जाते. वरळी गावाच्या पश्‍चिमेला अथांग अरबी समुद्र पसरलेला आहे. तेथील टेकडीवरच गोल्फादेवीचे अधिष्ठान आहे. बाराव्या शतकात बिंबराजाने हे देऊळ बांधले. बिंबराजे चक्रधरांच्या काळातील. इसवी सन 1294 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामुळे देवगिरीतील यादवांच्या साम्राज्याला उतरती कळा लागली. त्यानंतर  मध्ये यादवांच्या राज्याची इतिश्री झाली. खिलजीची स्वारी झाली तेव्हा यादव राजा रामदेव याने आपल्या मुलांपैकी बिंबराजास देवगिरीहून मुंबईला पाठविले. त्याने माहीम बेट काबीज केले व तेथेच आपली राजधानी उभारली. बिंबराजा विलक्षण धार्मिक होता. त्याने आपल्या सत्ताकाळात अनेक देवी-देवतांची प्रतिष्ठापना केली. मढची हरबादेवी, माहीमची शीतलादेवी, प्रभादेवीतील प्रभादेवी व वरळीची गोल्फादेवी ही देवतांची मंदिरे त्याच काळातील.

आता हे काय नवीन स्वीट चार्ली तुमच्या भेटीला! ..'हे' तिचे आरोग्यदायी फायदे

कोळी समाजाची नितांत श्रद्धा

गोल्फादेवीचे वर्णन "ज्ञानतेजाने झळकणारी पंचभौतिक परमाणुशक्ती आणि चैतन्यशक्ती' असे केले जाते. गोल्फादेवीच्या शेजारीच पाषाणात कोरलेल्या हरबादेवी आणि साकबादेवीच्या तीन मूर्ती आहेत. पौष महिन्याच्या शाकंभरी पौर्णिमेला गोल्फादेवीची यात्रा भरते. नऊ पाटील इस्टेट कमिटीतर्फे सूर्यास्तापूर्वी दीपमाळ प्रज्वलित केली जाते. मुंबई, ठाणे, रायगड आदी ठिकाणांहून सकाळपासून भक्त दर्शनासाठी गर्दी करतात. वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाची या देवीवर नितांत श्रद्धा आहे. मासेमारीसाठी बोट समुद्रात सोडायची असल्यास देवीचा कौल घेतल्याशिवाय ती सोडली जात नाही, इतके या देवीचे महत्त्व त्यांच्या जीवनात आहे. लग्नाच्या मुहूर्ताबरोबरच घरात शुभकार्य असल्यासही देवीचा कौल घेतला जातो. या परिसराला लागूनच वरळी सी-फेस आहे. नजीकच दादर आहे. तेथील गर्भश्रीमंतांच्या टोलेजंग वस्त्या, मध्यमवर्ग-नवमध्यमवर्गाच्या उत्तुंग इमारती डोळे दीपवून टाकतात. त्या संस्कृतीतही वरळी गावाचे गावपण, तेथील पारंपरिक संस्कृतीही नजरेत भरते.

महत्त्वाची बातमी - सोने खरेदी रोडावली, आहे खास कारण... 

प्रभादेवी

प्रभादेवी मंदिराच्या आजुबाजूचा सेंच्युरी, स्टँडर्ड, बॉम्बे डाईंग आदी गिरण्यांचा आणि हजारोंनी राहणाऱ्या गिरणी कामगारांच्या अनेक चाळी व वाड्यांचा होत्या.अाता गिरण्या-चाळी-झोपडपट्ट्या, वाड्या नामशेष होऊन चकाचक कॉर्पोरेट कंपन्या किंवा टोलेजंग टॉवर आले आहेत. पण उत्साहात कमी नाही आली.प्रभादेवी ही मूळची शाकंबरी देवी. सध्या मंदिरात असलेली शाकंबरीची मूर्ती 12व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते. इ.स. 1714 मध्ये देवीची स्थापना करून 1715 मध्ये मंदिरांचे बांधकाम पूर्ण केले. पाठारे-प्रभूंची देवी म्हणून तिचे नामकरण प्रभावती असे करण्यात आले.

corporate mumbai is preserving their local traditional rituals of fun fair also known as jatra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporate mumbai is preserving their local traditional rituals of fun fair also known as jatra