तृतीयपंथीयांसाठी महामंडळ हवे - त्रिपाठी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

मुंबई - तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी तृतीयपंथीयांच्या नेत्या लक्ष्मी त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली आज मंत्रालयात महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या दालनात जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली. मात्र या वेळी मुंडे उपस्थित नव्हत्या.

कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात तृतीयपंथीयांच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला होता. हा ठराव मंजूर होऊन तीन वर्षे झाली तरी फडणवीस सरकारने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या तृतीयपंथीयांनी आज थेट मंत्रालयालाच धडक दिली. तृतीयपंथीयांच्या नेत्या लक्ष्मी त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुंडे यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. या वेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे मंत्रालयात एकच खळबळ माजली.

Web Title: corporation important for eunuch