पालिकेचे कर भरण्यासाठी "पेटीएम'चा पर्याय? 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - राज्यातील महापालिकांमध्ये नागरिकांना भराव्या लागणाऱ्या विविध करांसाठी पेटीएमचा पर्याय मिळावा म्हणून कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू केली आहे. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास राज्यातील सर्व स्थानीय स्वराज संस्थांमध्ये नागरिकांना असा पर्याय वापरणे शक्‍य होईल. सध्या गुरगावमध्ये अशा पद्धतीने कर भरला जात आहे. नागरिकांचा वेळ वाचावा आणि आर्थिक व्यवहार सोपे- सुरळीत व्हावेत ही त्यामागची संकल्पना असल्याचे मत "पेटीएम'चे सहयोगी उपाध्यक्ष रिपुनजय गौर यांनी व्यक्त केले. 

मुंबईत पत्रकारांशी बोलताना गौर यांनी "पेटीएम'च्या आगामी नियोजनाबाबतची माहिती दिली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दंडापोटीच्या चलनासाठी "पेटीएम'ने पैसे भरण्याचा पर्याय क्‍यूआर कोडच्या माध्यमातून देण्याचाही प्रस्ताव आहे. वाहतूक विभागाच्या संमतीनंतर त्याबाबतची अंमलबजावणी होईल असे ते म्हणाले. प्रीपेड टॅक्‍सीसाठी टॅक्‍सी बूथच्या आणखी ठिकाणांचा समावेश करणार असल्याचे ते म्हणाले. सध्या मुंबईत चार ठिकाणी पेटीएमचा पर्याय आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्‍सीसाठी तसेच ऑटो रिक्षासाठी स्मार्टफोन आणि पेटीएमचा वापर यांसारख्या सुरुवातीच्या काळातील आव्हाने होती; पण आता बऱ्यापैकी पेटीएमचा स्वीकार होऊ लागला आहे असे ते म्हणाले. 

उर्वरित महाराष्ट्रातही पेटीएम 
पेटीएम वॉलेटसाठी मुंबईसारख्या शहरात जिथे मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा केली जात होती, तिथेच उर्वरित महाराष्ट्रातील शहरातील ग्राहकांनीही अशा पर्यायाचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला आहे. क्रेडिट-डेबिट कार्डचा मोठा वापर नसलेल्या शहरांतही पेटीएम वॉलेटचा वापर उत्तमरीत्या होत आहे, असे मत रिपुनजय गौर यांनी व्यक्त केले. महाराष्ट्रात 29 शहरांमध्ये सध्या पेटीएमचा पर्याय देण्यात आला आहे. महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये कॅशलेश व्हिलेजची संकल्पना राबवण्यात आली. पुणे, रत्नागिरी आणि नागपूरमधील एकूण शंभर गावांमध्ये कॅशलेस व्हिलेजची संकल्पना राबवण्यात येणार आहे. 

Web Title: Corporation tax to pay TM option