नगरसेवक निधीवरही संक्रांत 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

मुंबई - शिवसेनेच्या अजेंड्याला यंदा कात्री लागण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर पाच स्वीकृत नगरसेवकांसह 232 नगरसेवकांना मिळणाऱ्या एक कोटी रुपयांचा अतिरिक्त विकास निधीवरही संक्रात येण्याची शक्‍यता आहे. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प तब्बल 11 हजार कोटींनी कमी झालेला असल्याने यंदा स्थायी समितीत निधीमध्ये फेरफार करण्यास फारसा वाव राहिलेला नाही. त्यातच "प्रकल्प दाखवा, निधी घ्या' अशी भूमिका आयुक्त अजोय मेहता यांनी घेतल्याने या राजकीय शोबाजीला लगाम लागण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

महानगरपालिकेचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करताना त्यात गेल्या वर्षी 450 कोटी रुपयांची फेरफार करण्यात आली होती. या फेरफारीतून उपलब्ध झालेल्या निधीतून 232 नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये देण्यात आले होते. तर, शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनाही यातून त्यांचे प्रकल्प राबविण्यासाठी निधीची तरतूद करून घेतली होती. शिवसेना दर वर्षी वचननाम्यातून दिलेल्या आश्‍वासनांसाठी या निधीतून तरतूद करून घेते; मात्र यंदा या निधीला कात्री लागण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शिवसेनेच्या या अजेंड्याला कात्री लागण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर नगरसेवकांचा अतिरिक्त निधीही कमी होऊ शकतो. 

महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 37 हजार कोटींहून 25 हजार कोटींवर आणला आहे. या वेळी विभागांना हवा तसा निधी उपलब्ध करून न देता वर्षभरात जितके काम करता येऊ शकते, तेवढ्याच निधीची तरतूद करण्यात आली आहे. "प्रकल्प दाखवा तरच निधी मिळेल' हीच भूमिका आयुक्त मेहता स्थायी समितीसाठी घेण्याची दाट शक्‍यता आहे. 

अशी होते फेरफार 
रस्तेदुरुस्तीसाठी तीन हजार कोटी रुपयांची तरतूद असेल. तर त्यातील 100 ते 200 कोटी रुपयांचा निधी वळवता येऊ शकतो. अशाच प्रकारे इतर प्रकल्पातील निधी वळवून त्यातील हे 450 कोटी रुपये जमा केले जातात; मात्र यंदा वर्षभरात जेवढे काम होऊ शकते तेवढ्याच निधीची तरतूद केलेली असल्याने अशा प्रकारे फेरफार करण्यास कमी आहे. 

Web Title: corporator funds