डंपिंग ग्राऊंड हटवण्यासाठी नगरसेवक व्यापाऱ्यांची वज्रमुठ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

उल्हासनगर : म्हारळच्याजवळील डंपिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून कॅम्प नंबर 5 मध्ये तयार करण्यात आलेल्या डंपिंगवर मृत जनावरांचा सडा पडत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना श्वास घेणे दुश्वार झाले आहे. त्याचे नकारात्मक पडसाद उमटले असून आज नगरसेवक-व्यापाऱ्यांनी वज्रमुठ तयार करून डंपिंग हटवण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी म्हारळच्या जवळील डंपिंग ओव्हरफ्लो झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून कॅम्प नंबर 5 च्या हद्दीतील भूखंडावर डंपिंग तयार केले होते. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, आमदार डॉ.बालाजी किणीकर, उपशहरप्रमुख परशुराम पाटील आदींनी डंपिंग ग्राऊंड बंद करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता.

दरम्यान डंपिंगला दोन वर्षे झाले असून त्यावर ओल्या-सुक्या कचऱ्या सोबत कुत्रा मांजर, उंदीर, घुशी अशा मृत जनावरांना टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. याचा विरोध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दायमा, अनुष्का शर्मा आदींनी वज्र संघटनची स्थापना केली आहे. आज आमदार डॉ.बालाजी किणीकर, उपशहरप्रमुख परशुराम पाटील, नगरसेवक सतरामदास जेसवानी, किशोर वनवारी, शेरी लुंड, अरुण आशान, आकाश पाटील, विकास पाटील, सरिता गायकवाड, माजी नगरसेवक बच्चाराम रुपचंनदानी, सुरेश गायकवाड आणि व्यापाऱ्यांनी वज्रमुठ तयार करून धरणे आंदोलनाद्वारे डंपिंग हटवण्याची मागणी केली आहे.

Web Title: Corporators and traders demand to remove dumping ground