नगरसेवकाच्या कारचे आरसे 'गायब'

दीपक शेलार 
शनिवार, 14 जुलै 2018

ठाण्यात वाहनांसह गाड्यांचे टायर चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असतानाच आता आलिशान कारचे आरसेदेखील चोरटे लांबवत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील शिवसेना नगरसेवक संजय देवराम भोईर यांच्या दोन आलिशान कारचे सुमारे 55 हजारांचे आरसे चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली.

ठाणे : ठाण्यात वाहनांसह गाड्यांचे टायर चोरीला जाण्याच्या घटना ताज्या असतानाच आता आलिशान कारचे आरसेदेखील चोरटे लांबवत असल्याचे समोर आले आहे. ठाण्यातील शिवसेना नगरसेवक संजय देवराम भोईर यांच्या दोन आलिशान कारचे सुमारे 55 हजारांचे आरसे चोरट्यांनी लांबवल्याची घटना उघडकीस आली.

याप्रकरणी भोईर यांनी कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी राबोडी येथील दुकलीपैकी एका चोराला ताब्यात घेतले आहे. ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक संजय भोईर यांच्या बाळकुम पाडा नं.3 येथील राहत्या घरासमोरून त्यांच्या इनोव्हा आणि फॉर्च्युनर या आलिशान गाड्यांचे आरसे चोरट्यांनी लांबवले होते.

इनोव्हा कारचा 15 हजारांचा एक आरसा आणि 40 हजारांचे फॉर्च्युनरचे दोन आरसे चोरट्यांनी लंपास केले होते. याबाबत तक्रार दाखल होताच कापुरबावडी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून राबोडी परिसरातून एका चोरट्याला ताब्यात घेतले असून, दुसऱ्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Corporators cars Mirror have been theft