भिवंडी ग्रामीण भागात खड्डे भरण्याच्या कामात भ्रष्टाचार

दीपक हिरे
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

वज्रेश्वरी - पावसाळी व उन्हाळी खड्डे भरण्याच्या कामात मयूर कंष्ट्रशन या भाजपच्या ठेकेदाराने लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याने या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून संबंधित कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांनी राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली आहे. आमदारांनी या भ्रष्टाचाराची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे कार्यालयाबरोबरच थेट बांधकाम मंत्र्यांकडे केल्याने  भ्रष्ट ठेकेदाराचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत. 

शिवसेनेचे भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचे खड्डे भरण्यासाठी सन २०१६ ते २०१८ या दोन वर्षांसाठी तब्बल ६९ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासूनहे खड्डे भरण्याचे काम संबंधित ठेकेदाराने केले आहे. मात्र खड्डे भरतांना फक्त मातीभराई करून खड्डे भरण्याचे काम संबंधित ठेकेदाराने केले आहे. त्यामुळे या रस्त्यांवर आता पुन्हा खड्डे पडल्याने या कामात संबंधित ठेकेदाराने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याची जाणीव आमदार मोरे यांना झाल्याने त्यांनी या भ्रष्ट ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी व केलेल्या कामाची चौकशी करण्यासाठी थेट राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे लेखी तक्रारी निवेदन दिले आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदाराचे चांगलेच ढाबे दणाणले आहेत. 

दरम्यान "या प्रकरणाविषयी आपल्याला काही एक माहित नाही" अशी प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिवंडीचे अभियंता धात्रक यांनी दिली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडीच्या आशीर्वादानेच भिवंडीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत. असल्याची भावना सुद्न्य नागरीक व्यक्त करीत आहेत.

Web Title: Corruption in the work of filling in Bhiwandi rural areas