‘कॉसमॉस’ची आयटी सेवा फोल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुंबई - कॉसमॉस बॅंकेवर मालवेअर हल्ला झाला असल्याचा दावा करून नॅशनल पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाने (एनपीसीआय) बॅंकेच्या आयटी सुरक्षेबाबत प्रश्‍न उपस्थित केला आहे. ‘एनपीसीआय’ची आयटी यंत्रणा पूर्णपणे सुरक्षित आहे. ऑनलाइन दरोडा बॅंकेच्या सदोष यंत्रणेमुळे झाला असल्याचे ‘एनपीसीआय’ने म्हटले आहे. हा मालवेअर हल्ला नसल्याचे कॉसमॉस बॅंकेने आधी म्हटले होते.

कॉसमॉस बॅंकेचा सर्व्हर हॅक करून हॅकर्सनी बॅंकेतील ९४ कोटी ४२ लाखांची रक्कम २९ देशांमधील एटीएममधून काढून घेतली. कॉसमॉस बॅंकेवरील ऑनलाइन दरोड्याने बॅंकिंग क्षेत्रातील माहिती आणि तंत्रज्ञान यंत्रणेसंदर्भात प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. कॉसमॉस बॅंकेच्या आयटी सेवेवर मालवेअर हल्ला झाल्यामुळे हा ऑनलाइन दरोडा पडल्याचे ‘एनपीसीआय’च्या जोखीम व्यवस्थापन विभागाचे प्रमुख भरत पांचाळ यांनी सांगितले. कॉसमॉस प्रकरणानंतर ‘एनपीसीआय’ दक्ष झाली आहे. भारतातील किरकोळ ऑनलाइन पेमेंट आणि सेटलमेंटचे व्यवस्थापन ‘एनपीसीआय’कडून केले जाते. 

‘एनपीसीआय’ नेटवर्कमधील एका सदस्याने बॅंकेच्या आयटी सेवेवर मालवेअर हल्ला झाल्याची खात्री केल्याचे त्यांनी सांगितले. हॅकर्सनी ११ आणि १३ ऑगस्टला कॉसमॉस बॅंकेवर डल्ला मारला. बहुतांश व्यवहार परदेशांमधून करण्यात आल्याचे पांचाळ यांनी सांगितले. ते म्हणाले, की ‘एनपीसीआय’ची आयटी सेवा पूर्णपणे सुरक्षित आहे. हा हल्ला कसा झाला आहे. याप्रकरणी तपासात ‘एनपीसीआय’कडून बॅंकेला पूर्णपणे सहकार्य केले जाईल.

सुरक्षेवर जेमतेम खर्च
बॅंकिंग क्षेत्रातील तीव्र स्पर्धेने बॅंकांच्या उत्पन्नावर परिणाम केला आहे. त्यामुळे सहकारी बॅंकांमध्ये आयटी सुरक्षेवर जेमतेम खर्च केला जात आहे. या बॅंका हॅकर्सचे सॉफ्ट टार्गेट असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. जागतिक दर्जाच्या अद्ययावत माहिती आणि तंत्रज्ञान प्रणालीसाठी बॅंकांना मोठी तरतूद करावी लागते; अन्यथा हॅकर्सकडून सहजपणे सायबर हल्ले केले जातील, अशी भीती सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Cosmos Bank Cyber Attack Crime IT Service