...तर संघर्ष अटळ - राज

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

मुंबई - कोस्टल रोडमुळे वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांचा रस्ता अडवला जाऊ नये म्हणून महापालिका आयुक्तांची भेट घेऊ. सामंजस्याने तोडगा निघायला हवा; मात्र आडमुठेपणा केल्यास संघर्ष अटळ आहे, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिला. कोस्टल रोड वरळी येथे सागरी सेतूला जोडण्यासाठी समुद्रात खांब उभारला जाणार आहे.

त्यामुळे कोळीवाड्यातील मासेमारी नौकांना अडथळा येणार आहे. दुसऱ्या बाजूला खडक असल्याने तेथून नौका घेऊन जाता येणार नाहीत. पूर्वी हा खांब बांधण्यात येणार नव्हता; मात्र खांब बांधण्याचा निर्णय झाल्याने त्याविरोधात मच्छीमारांनी आंदोलन सुरू केले आहे. राज ठाकरे यांनी रविवारी या आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या.

Web Title: Costal Road Disturbance Raj Thackeray