'अभ्यासक्रमाला मिळावी कौशल्याची जोड '

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 एप्रिल 2017

कल्याण - देशात गुणवत्ता आहे, त्याला कौशल्याची जोड देत परिपूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ; तसेच अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले. सुभेदार वाडा कट्ट्यावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

कल्याण - देशात गुणवत्ता आहे, त्याला कौशल्याची जोड देत परिपूर्ण शिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ; तसेच अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी येथे केले. सुभेदार वाडा कट्ट्यावर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

आपल्याकडे शिक्षण घेऊन अमेरिकेत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या सर्वाधिक आहे. जे त्या देशात भारतीयांनी केले, ते इथे का करू नये, असा प्रश्‍न काकोडकर यांनी उपस्थित केला. भारतात संशोधन केले जाते; मात्र त्यानंतर आपण इतर देशांबरोबर परस्पर सहकार्य धोरण अंगीकारत त्याचा विकास करतो. यामुळे त्या संशोधनाची दिशा; तसेच त्यातील प्राधान्यक्रम बदलतात. याचा विचार करून देशांतच काम झाले पाहिजे, असे ते म्हणाले. 

देशात सध्या सुरू असणाऱ्या अणुऊर्जा कार्यक्रमाला अधिक गती येणे गरजेचे असून भविष्यात आवश्‍यक ती गती प्राप्त होईल, असा विश्‍वासही काकोडकर यांनी व्यक्त केला. पत्रकार नीरज पंडित यांनी त्यांच्याशी संवाद साधला. भारताने 1974 आणि 1998 या दोन वर्षांत केलेल्या अणचिाचण्यांनंतर संपूर्ण जगाचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. आंतरराष्ट्रीय दबावानंतरही देशाने अणुऊर्जा क्षेत्रात केलेली प्रगती उल्लेखनीय असल्याचे काकोडकर म्हणाले. सद्यस्थितीचा विचार करता त्यात गती येण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या क्षेत्रात काम करत असताना आलेले अनुभव त्यांनी या वेळी सांगितले. 

आजच्या मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच वस्तुनिष्ठतेवर (प्रॅक्‍टिकल) आधारित शिक्षण देण्याची खरी गरज आहे. त्यासाठी आपल्याकडील शैक्षणिक वातावरण बदलून अभ्यासक्रम आणि कौशल्य विकासाचे एकत्रित शिक्षण दिले गेल्यास त्याचा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होईल, असे त्यांनी या वेळी सांगितले. सर्वात आधी भारताने शोध लावला आणि त्याचा जगभर वापर होतो, असे संशोधन आपल्याकडे होत नसल्याची खंतही काकोडकर यांनी या वेळी बोलून दाखवली. 

Web Title: Courses provide the skills attachment