हल्ल्यातील पीडितांना भरपाईबाबत विचारणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

मुंबई- दहा वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासह अन्य बॉंबस्फोट हल्ल्यांतील पीडितांना राज्य सरकारकडून नुकसानभरपाई मिळाली का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारकडे केली.

राज्यात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांतील पीडित किंवा त्यांच्या वारसांना त्यांच्या आर्थिक मिळकतीच्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळाली पाहिजे, असा दावा याचिकादार ऍड. राजेश्‍वर पांचाळ यांनी केला. मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. 1993 मधील साखळी बॉंबस्फोटांनंतर झालेल्या सर्व दहशतवादी हल्ल्यांतील पीडितांचा तपशील देण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना प्रत्येकी तीन लाख रुपये दिल्याची माहिती सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्यायालयाला दिली. अद्याप काही हल्ल्यांतील पीडितांना भरपाई देण्याचे काम सुरू आहे, असे पोलिस उपायुक्त अश्‍विनी सानप यांनी सांगितले. याचिकेवर दोन आठवड्यांनंतर सुनावणी होईल.

Web Title: court asks about compensation to victims of 26/11 attack