शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना न्यायालयाने फटकारले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - अंबरनाथमधील कार्यक्रमात ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन झाल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना फटकारले आहे. खासदार असूनही तुम्हाला गांभीर्य नाही का, असा सवाल करीत पुन्हा नियमांचे उल्लंघन करणार नाही, अशी हमी त्यांच्याकडून मागितली आहे. 

महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाविरोधात ध्वनी व वायुप्रदूषणाबाबत अवमान याचिका दाखल केलेली असतानाही या ठिकाणी आनंद मेळ्याला परवानगी देण्यात आली होती. या मेळ्यात जायंट व्हील, फॅमिली राईड आणि डिझेलवर चालणारी अन्य उपकरणे चालवली जातात. त्यामुळे ध्वनी आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. शिवाय रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणांवर अतिक्रमण करून मंडप उभारले जातात. याविरोधात हिराली फाऊंडेशनच्या अध्यक्षा सरिता खानचंदानी यांनी पोलिस आणि पालिकेकडे तक्रार केली होती. या कार्यक्रमाचे आयोजक खासदार शिंदे असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारा केला होता. यानंतर पोलिस व पालिका प्रशासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून असे प्रकार घडणार नसल्याची ग्वाही दिली होती. 

कारवाई नाहीच! 
या प्रकरणात आयोजक असलेल्या खासदारांवर काहीच कारवाई झाली नसल्याबद्दल उच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक आणि न्या. रियाज चागला यांच्या खंडपीठाने बुधवारच्या सुनावणीत आश्‍चर्य व्यक्त केले. 

Web Title: court convicted Shivsena MP Shrikant Shinde