PHOTO : असा आहे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांसाठीचा 'अत्यावश्यक पास'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना जीवनावश्यक गोष्टी खरेदी करताना कोणताही त्रास होऊ नये आणि अत्यावश्यक गोष्टी पुरवणाऱ्या व्यावसायिकांना देखील या सेवा पुरवताना त्रास होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी आता 'इसेन्शिअल' म्हणजेच 'अत्यावश्यक सेवा पास' दिलाय.

मुंबई - कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्रात सरकारकडून मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात आल्यात. देश लॉकडाऊन होण्याआधीच महाराष्ट्र आणि मुंबईला लॉकडाऊन करण्यात आलं. याला कारण म्हणजे मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका आणि कोरोना बाधित पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढत जाणारा आकडा.

अशात प्रशासनाकडून, आरोग्य मंत्र्यांकडून, थेट मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांकडून वारंवार घरात राहा, घरातून बाहेर पडू नका असं आवाहन करण्यात येतंय. दरम्यान आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडतायत. अत्यावश्यक गोष्टी विकत घेण्यासाठी आणि विकणाऱ्यांसाठी मुंबई पोलिस देखील योग्य पद्धतीने मार्गदर्शन करताना पाहायला मिळतायत. 

COVID19 : मुंबई दुसऱ्यावरून कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीये का ?

लॉकडाऊनच्या परिस्थितीत नागरिकांना जीवनावश्यक गोष्टी खरेदी करताना कोणताही त्रास होऊ नये आणि अत्यावश्यक गोष्टी पुरवणाऱ्या व्यावसायिकांना देखील या सेवा पुरवताना त्रास होऊ नये म्हणून मुंबई पोलिसांनी आता 'इसेन्शिअल' म्हणजेच 'अत्यावश्यक सेवा पास' दिलाय. या कार्डच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदारांना आपली दुकानं बिनदिक्कत सुरु ठेवता येणार आहेत. याबाबत मुंबई पोलिसांनी स्वतः ट्विट करत माहिती दिलीये 

मोठी गुड न्यूज : १५ कोरोना पॉझिटिव्ह झालेत निगेटिव्ह, मिळाला डिस्चार्ज 

अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सर्वांनी आपल्या नजीकच्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन हा पास घ्यावा, जेणेकरून अत्यावश्यक विभागात येणाऱ्या सेवा आणि गोष्टी विकताना त्यांना त्रास होणार नाही असं मुंबई पोलिसांनी आवाहन केलंय. 

Essential pass for essential services all shops providing essential services reach out to their local police station


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid 19 mumbai police issued Essential pass for essential services