खडसेंना कोरोनाची लक्षणे, आजच्या ED चौकशीला उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह

खडसेंना कोरोनाची लक्षणे, आजच्या ED चौकशीला उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी आज चौकशीसाठी हजर राहावं असं समन्स ईडीकडून बजावण्यात आलं आहे. दरम्यान एकनाथ खडसेंना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यामुळे आज एकनाथ खडसे ED चौकशीला उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत. म्हणून एकनाथ खडसे यांची RT PCR टेस्ट करण्यात आली. दरम्यान अद्याप एकनाथ खडसे यांचे रिपोर्ट्स आलेले नाही. एकनाथ खडसे यांच्या रिपोर्टची अद्याप प्रतीक्षा आहे अशी माहिती रक्षा खडसे यांनी दिली आहे. खडसेंचा कोरोनाबाबतचा रिपोर्ट आल्यानंतर खडसे चौकशीला सामोरे जाणार काही नाही, हे स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलयं.

भोसरी MIDC तील भूखंड व्यवहार प्रकरणात ईडीने त्यांना नोटीस बजावली आहे. या चौकशीला उपस्थित राहण्यासाठी खडसे दोन दिवसांपूर्वी जळगावहून मुंबईला दाखल झाले होते.

covid 19 symptoms to eknath khadase RTPCR reports awaited question mark on ED enquiry

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com