मुंबईत दहिसर आणि मुलुंडमध्ये तब्बल 'इतक्या' खाटांच्या उपचार केंद्राचे काम प्रगतीपथावर..

covid centers
covid centers

मुंबई : दहिसर पूर्व व पश्चिम येथे १,०६५ खाटांचे; तर मुलुंड येथे १ हजार ९१५ खाटांच्या उपचार केंद्राचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली. कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी तिन्ही ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या 'जम्बो फॅसिलिटी' जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरु होणार आहे.

दहिसर पूर्व व पश्चिम सह मुलुंड येथील निर्माणाधीन 'जम्बो फॅसिलिटी'ची पालकमंत्री श आदित्य ठाकरे यांनी केली पाहणी केली. कोरोना बाधित रुग्णांवर अधिक प्रभावीपणे उपचार करता यावेत, यासाठी पालिका क्षेत्रातील काही ठिकाणी 'जंबो फॅसिलिटी' अर्थात अधिक क्षमतेची उपचार केंद्रे यापूर्वीच रुग्ण सेवेत रुजू झाली आहेत. 

याच शृंखलेत आता 'मुंबई मेट्रो'च्या पुढाकाराने दहिसर पूर्व येथे ९५५ खाटांचे; तर दहिसर पश्चिमेकडे कांधरपाड्याजवळ ११० खाटांचे रुग्णालय उभारण्यात येत आहे. तर मुलुंड परिसरात लालबहादूर शास्त्री मार्गालगत १ हजार ९१५ खाटांचे उपचार केंद्र 'सिडको'च्या पुढाकाराने उभारण्यात येत आहे. 

पालिका क्षेत्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात येत असलेल्या या तिन्ही उपचार केंद्राची पाहणी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच केली. या तीनही ठिकाणांची पाहणी केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी दिवस-रात्र सुरू असलेल्या कामांबाबत समाधान व्यक्त केले. ही तिन्ही उपचार केंद्रे या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होतील.

दहिसर पश्चिम भागात ११० खाटांचा दक्षता कक्ष:

संबंधित पाहणी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मंत्रीमहोदयांनी दहिसर पश्चिमेला असणाऱ्या कांधरपाडा परिसरात उभारण्यात येत असलेल्या ११० खाटांच्या प्रस्तावित दक्षता कक्षाची पाहणी केली. याठिकाणी प्रस्तावित असणाऱ्या ११० खाटांपैकी ७७ खाटा ह्या 'हाय डिपेंडन्सी युनिट'अंतर्गत असणार आहेत. तर ३३ खाटा या अतिदक्षता कक्षाचा भाग असणार आहेत. तर उर्वरित १० खाटा या कोरोना बाधित रुग्णांच्या डायलिसिस करिता राखीव असणार असून त्यांचा गरजेनुसार वापर केला जाणार आहे, अशी माहिती प्रस्तावित 'मुंबई मेट्रो'च्या अधिकाऱ्यांनी दिली.

covid centers having many beds will made in mulund and dahisar  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com