एकदम फिल्मी ड्रामा ! पोलिसांच्या हातावर दिली तुरी आणि कोविड सेंटरमधून पळालेला पॉझिटिव्ह पुन्हा निसटला

एकदम फिल्मी ड्रामा ! पोलिसांच्या हातावर दिली तुरी आणि कोविड सेंटरमधून पळालेला पॉझिटिव्ह पुन्हा निसटला

मुंबई : शिवाजी नगर येथील कोविड सेंटरमधून पलायन केलेला बाधीत आरोपी पुन्हा पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटला. दोन दिवसांपूर्वी पळालेला हा आरोपी दुचाकीवर पोलिसांना दिसला होता. त्यावेळी त्याचा पाठलाग करताना आरोपीने पोलिसांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दोन पोलिस जखमी झाले असून एकाची गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाबाधित कैद्यांना विलगीकरण कक्षात ठेवले असताना शिवाजीनगरमध्ये कोरोना पॉझीटीव्ह आरोपी पळून गेल्याने त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. २० वर्षीय संतोष मेहराज तिवरेकर आणि १९ वर्षीय इरफान शकीर अली खान अशी या दोघांची नावं आहेत. 

मेहराज तिवरेकर याने चेंबूरमधील RCF कॉलनीत एका व्यक्तीवर पूर्व वैमन्यसातून प्राणघातक हल्ला केला होता. त्याला पोलिसांनी 29 जूनला अटक केली होती. तर दुसरा आरोपी खान याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले होते. त्याला पोलिसांनी 1 जुलैला अटक केली होती. पोलिसांच्या ताब्यात असतानाच  गेल्या आठवड्यात आरोपी संतोष आणि  इरफानमध्ये कोरोनाची लक्षण आढळून आली. त्यानुसार त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गोवंडी येथील शिवाजी नगरमधील कोविड सेंटरच्या 602 क्रमांकाच्या विलगीकरण खोलीत ठेवण्यात आले होते. त्यांच्यासोबत अन्य एका व्यक्तीला ठेवले होते. त्यांच्यावर पळत ठेवण्यासाठी दोन सुरक्षारक्षकही होते. मात्र पाळत ठेवण्यात आलेले पोलिस कोविड सेंटरच्या बाहेर असल्याने काही तासासाठी का होईना ते पोलिसांच्या नजरे आड होते.

याच संधीचा फायदा घेऊन त्यांनी पळण्याचा कट आखला. या दोघांनी 13 जुलैच्या मध्यरात्री त्याच्या खोलीच्या दरवाजाची कडी तोडून पळ काढला. ते इतक्या सावध रित्या तेथून  पळून गेले त्याची कल्पना त्या आरोपीच्या खोलीतील तिसऱ्या व्यक्तीलाही आली नाही. तिवरेकर पळून गेल्याची कल्पना आरसीएफ पोलिसांना देण्यात आली होती. त्यानुसार पोलिस त्याच्या मागावर होते.

दोन दिवसांपूर्वी तिवरेकर हा चेंबूर परिसरात दुचाकीने फिरताना गस्तीवरील दोन पोलिसांना आढळला. त्यानुसार पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना हुलकवणी देऊन तिवरेकरने पळ काढला. पोलिसांनी त्याचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला. एका ठिकाणी तिवरेकर पोलिसांच्या तावडीत सापडणार तोच त्याने पोलिसांच्या गाडीला जोरदार घडक दिली. या अपघातात पोलिसांची दुचाकी पडली आणि तिवरेकर पळाला. या अपघातात दोन्ही पोलिस जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी तिवरेकर विरोधात  307,353,427 भा.द.वि कलमांतर्गत नवा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस तिवरेकरचा शोध घेत आहेत.

( संपादन - सुमित बागुल ) 

covid patient who escaped from covid center escaped from the hands of the police

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com