कोविडमध्ये घेतलेल्या व्हेंटिलेटरचा मुंबई पालिका करणार 'असा' वापर

कोविडमध्ये घेतलेल्या व्हेंटिलेटरचा मुंबई पालिका करणार 'असा' वापर

मुंबई: कोविड काळासाठी घेण्यात आलेले 600 व्हेंटिलेटर भविष्यात महानगर पालिकेच्या उपनरीय रुग्णालये आणि प्रसुतीगृहांसाठी वापरण्यात येणार आहे. या व्हेंटिलेटरचे नियोजन करण्यासाठी महानगर पालिकेने समितीही तयार केली आहे.
 
मुंबई महानगर पालिकेच्या सर्व रुग्णालयात मिळून 1 हजारच्या आत व्हेंटिलेटर आहेत. रुग्णालयातील रुग्णालयांची संख्या पाहता हे व्हेंटिलेटर नेहमीच अपुरे असतात. कोविड काळात व्हेंटिलेटरची वाढलेली गरज पाहून पालिकेने जंम्बो कोविड केंद्रात 600 व्हेंटिलेटर सज्ज केले होते.यातील काही व्हेंटिलेटर महानगर पालिकेने विकत घेतले तर काही व्हेंटिलेटर केंद्र सरकारकडून अनुदान मिळाले आहे. भविष्यात या व्हेंटिलेटरचा वापर पालिकेच्या रुग्णालयात करण्यात येणार आहे. विशेषत: उपनगरी रुग्णालय आणि प्रसुतीगृहात हे व्हेंटिलेटर वापरण्यात येतील अशी माहिती पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली. या व्हेंटिलेटरचे रुग्णालयाच्या गरजेनुसार नियोजन करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले. 

जंम्बो कोविड केंद्रात अतिदक्षता विभागही तयार करण्यात आले आहे. त्यासाठी सर्व आवश्‍यक उपकरणांची खरेदी महानगर पालिकेने केली होते. हे आयसीयू युनिटचा वापरही पालिकेच्या उपनगरातील रुग्णालयांसाठी करण्यात येणार आहे. त्याबाबतही समिती निर्णय घेणार आहे. महापालिका मुख्य रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी उपनगरातील रुग्णालयांचा विस्तार करणार आहे. त्यात या सुविधा वापरता येऊ शकतात असेही सांगण्यात आले.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Covid period ventilators bmc will use municipal suburban hospitals maternity wards

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com