लॉकडाऊनमध्ये औषधे अन् किराणा दुकानांबद्दल मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 मार्च 2020

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला धाडसी आणि मोठा निर्णय

मुंबई - . सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने यांना 24तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. आज मुख्य मंत्र्यांच्या वर्षा येथे कोरोना उपयाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली त्यात यावर चर्चा झाली..

लॉकडाऊन मुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत आहे , त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्न धान्य खरेदी करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र संबंधित दुकानांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता या बाबत शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असेही यासंदर्भात झालेल्या बैठकीत ठरले. 

COVID19 : मुंबई दुसऱ्यावरून कोरोनाच्या तिसऱ्या स्टेजला पोहोचलीये का ?

मुंबईत किंवा महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून एक मेसेज व्हायरल होत होता, त्यामंध्ये जीवनावश्यक गोष्टींची दुकानं ठराविक दिवशी आणि ठराविक वेळेतच सुरु राहतील असं नमूद करण्यात आलं होतं. खरंतर मुंबई पोलिसांकडून हे मेसेजेस खोटे असल्याचा आधीच खुलासा करण्यात आला होता. तरी देखील अनेकांकडून असे मेसेज फॉरवर्ड केले जातात आणि नागरिकांमधील पॅनिक बटण दाबलं जातं. 

अशात चुकीची माहिती मिळाल्याने आणि घाबरून अनेक जण जीवनावश्यक गोष्टींचा साठा करण्यासाठी घराबाहेर पडत असतात. लोकं घराबाहेर पडली तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता वाढते. जे राज्यासाठी आणि देशासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं. हीच बाब लक्षात घेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत धाडसी आणि मोठा निर्णय घेतलाय. 

covid19 crisis now grocery and medical stores in maharashtra will be open for twenty four hours


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid19 crisis now grocery and medical stores in maharashtra will be open for twenty four hours