esakal | लॉकडाऊनमध्ये फ्लिपकार्ट, ऍमेझॉन ने सुरु केलीये 'ही'अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा...
sakal

बोलून बातमी शोधा

लॉकडाऊनमध्ये फ्लिपकार्ट, ऍमेझॉन ने सुरु केलीये 'ही'अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा...

सरकारनं  किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास खुली ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर काही किराणा दुकानं २४ तास सुरूही ठेवले होते. मात्र लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसात ई-कॉमर्स कंपन्यांकडे सामानाची मागणी घटली होती.

लॉकडाऊनमध्ये फ्लिपकार्ट, ऍमेझॉन ने सुरु केलीये 'ही'अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई: जागतिक महामारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. त्यामुळे ऑनलाईन किराणा मालाची खरेदी करणाऱ्या व्यक्तींना किराणा माल उपलब्ध होऊ शकत नव्हता. मात्र आता सर्व ई-कॉमर्स कंपन्यांनी पुन्हा किराणा मालाची घरपोच सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारनं  किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास खुली ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर काही किराणा दुकानं २४ तास सुरूही ठेवले होते. मात्र लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काही दिवसात ई-कॉमर्स कंपन्यांकडे सामानाची मागणी घटली होती. त्यामुळे काही राज्यांमध्ये ई-कॉमर्स सेवांच्या डिलिव्हरींवर परिणाम झाला होता. त्यामुळे कंपन्यांनी सर्व सेवा बंद केली होती. मात्र आता किराणा माल आणि अत्यावश्यक मालाची घरपोच सेवा देण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी देण्यात आली आहे.

कर्जाचा EMI भरायचा का नाही ? नागरिकांनी काय करायला हवं, वाचा स्पेशल रिपोर्ट

सरकारनं फ्लिपकार्ट,  ऍमेझॉन, बिग बास्केट, ग्रोफर्स, झोमॅटो आणि स्विगी या कंपन्यांना  घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी दिली आहे. यात बहुतेक कंपन्यांनी किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवणाऱ्या आहेत. त्यामुळे कंपन्यांनी आपल्या सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत.

या सर्व कंपन्या घरपोच सेवा पुरवताना त्यांचे कर्मचारी, ग्राहकांचं सामान, वाहनं या सर्व गोष्टींचं निर्जंतुकिरण करणार आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांना आणि माल पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत तसंच त्यांना या संदर्भात योग्य ते प्रशिक्षणही देण्यात येत आहे. फ्लिपकार्टकडून डिलिव्हरी कर्मचाऱ्याचा आरोग्यविमा आणि जीवनविमा उतरवण्यात आला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला क्वारंटाइन करावं लागलं तर त्याला त्या दिवसांचा पूर्ण पगार दिला जाणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलंय.

कोरोनामुळे आपल्या आसपास झालेत 'हे' चांगले बदल; बातमी वाचाल तर छान वाटेल... 

"गेल्या काही दिवसांत किराणा मालाच्या मागणीत मोठ वाढ झाली आहे आणि  ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची क्षमता वाढवत आहोत. प्रशासन, पोलिस यंत्रणा व केंद्र सरकारकडूनही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक भावना आहे.आमच्या डिलिव्हरी टिम्सवर आणि पुरवठा साखळीवर नजर ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचं  मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत आहोत. त्यांना जीवनविमा, वैद्यकीय संरक्षण देण्यात येत आहे. जर एखादा कर्मचारी विषाणू संसर्गानं  बाधित झालाच तर त्यांना आवश्यक ती आर्थिक व वैद्यकीय मदत देण्याचीही आमची पूर्ण तयारी आहे, " असं  'फ्लिपकार्ट'चे मुख्य कॉर्पोरेट अफेअर्स अधिकारी म्हणालेत. 

covid19 lockdown amazon flipkart zomato swiggy will deliver household products

loading image