निःशब्द करणारी घटना ! कोरोना रुग्णाचा मृतदेह चक्क रस्त्यावर पडून, अमेरिका इटली नाही मुंबईतील धक्कादायक प्रकार...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 21 May 2020

कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने मृतदेह वॉर्डमध्ये पडून राहिल्याचे दिसले.

मुंबई, ता. 21 : कोरोना संसर्गामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याने मृतदेह वॉर्डमध्ये पडून राहिल्याचे दिसले. या घटना ताज्या असतानाच आता कोरोना बाधिताचा मृतदेह चक्क रस्त्यावर ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या संदर्भात भोईवाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

कोरोना वॉर्ड मध्ये मृतदेह पडून राहिल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेल्या केईएम रुग्णालयातीलच हा देखील प्रकार आहे. केईएम रुग्णालयातील शवागृहाबाहेरील ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. शवागृहे देखील मृतदेहांनी भरल्याने नातेवाईक मृतदेह न्यायला येतील यासाठी शवागृहाच्या बाहेरील रस्त्यावर कोरोनाचे  मृतदेह ठेवण्यात येतात. नातेवाईक किंवा शववाहिका येईपर्यंत तासनतास बाहेरच ठेवले जातात. मात्र दिवसभरात मृतदेह न्यायला कुणी आले नाही तर कोरोना मृतदेह शवागृहाच्या आत घेऊन जातात. अश्या प्रकारे मृतदेहांची हेळसांड सुरू असल्याचे दिसते. शिवाय  शवागृहाच्या बाहेर आलेले अनेक मयतांचे नातेवाईक आपले काम झाले की स्वतःचे हातमोजे किंवा मास्क रस्त्यावर टाकतात, यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.

मोठी बातमी - कोविडचा सामना करण्यासाठी सरकारकडून जम्बो सुविधा केंद्राचा निर्णय...

एकीकडे कोरोनाची लढाई, दुरीकडे भाजपचे ‘टार्गेट उद्धव ठाकरे’; असं आहे भाजपचं नियोजन

केईएम परिसरात अनेक मोठ्या वसाहती आहेत, यामुळे त्या वसाहतींमध्ये राहणाऱ्या रहीवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. निदान या परिसरात दररोज जंतुनाशक औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे, तसेच योग्य ती कार्यवाही व्हावी अशी मागणी इथल्या राहिवाश्यांनी केली आहे. याबाबत मनसेचे शाखा अध्यक्ष निकष इंदप यांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रुग्णालय प्रशासनाचे या सर्व समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. या माध्यमातून प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही पत्र व्यवहार केला आहे, जेणेकरून या परिसरात विशेष उपायोजना करून स्थानिकांच्या जीवाला धोका होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे इंदप यांनी सांगितले.

covid19 patient body lying on the road mismanagement of KEM hospital

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: covid19 patient body lying on the road mismanagement of KEM hospital