Video : 'आयआयटी'च्या विद्यार्थ्यांना गोमातेचं दर्शन!

वृत्तसंस्था
सोमवार, 29 जुलै 2019

वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक असताना ही गाय वर्गात आल्याचे दिसते. गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी आणि शिक्षक करताना दिसत आहेत पण ही गाय मात्र वर्गात बिनधास्त फिरताना दिसतेय.

देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक असलेल्या पवईच्या ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधील एका वर्गात हास्यास्पद प्रकार घडला आहे. विद्यार्थ्यांच्या वर्गात चक्क एक गाय शिरली आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झालाय. 

वर्गात विद्यार्थी आणि शिक्षक असताना ही गाय वर्गात आल्याचे दिसते. गायीला बाहेर काढण्याचा प्रयत्न विद्यार्थी आणि शिक्षक करताना दिसत आहेत पण ही गाय मात्र वर्गात बिनधास्त फिरताना दिसतेय. हा व्हिडिओ कमी वेळात इतका व्हायरल झाला की त्यावर जोक्सही येऊ लागले.

काही दिवसांपूर्वीही या कॅम्पसमध्ये असाच एक किस्सा घडला होता. मोकाट फिरणाऱ्या एका बैलाने एका विद्यार्थ्याला शिंगांनी उचलून फेकले होते. त्यानंतर आता पुन्हा या कॅम्पसमधून एक वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cow enters in classes of IIT Powai