कसारा-उंबरमाळी दरम्यान रुळाला तडा; वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 जानेवारी 2019

मुंबई - कसारा ते उंबरमाळी रेल्वेमार्गावर सकाळी 9 वाजताच्या दरम्यान थंडीमुळे रुळाला तडा गेल्याने कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेने येणाऱ्या रेल्वे गाड्यांची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

गुलाबी थंडीने मुंबईकर सुखावले असले तरी रेल्वे प्रवासी मात्र दुखावले आहे. कडाक्याच्या थंडीमुळे रेल्वे रुळाला तडे जाण्याच्या घटना घडत आहे. प्रवाशांच्या नववर्षाची सुरवात लेटमार्क ने झाल्यानंतर प्रवाशांचे मध्य रेल्वे मार्गावर हाल होत आहे. दरम्यान रुळाच्या दुरुस्तीचे काम रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर सुरू केले आहे. मात्र कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे आणि लोकल गाड्या खोळंबल्या आहेत. यामुळे अनेक प्रवासी अडकून पडले आहेत.

Web Title: cracks Kadar-Ummarmali trains track; Traffic jam