
Mumbai : विद्यार्थिनीच्या सुरक्षेसाठी मोबाईल अॅप तयार करा - डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करून संबंधित महाविद्यालयांचे प्रमुख, विद्यार्थी- विद्यार्थिनी, त्यांचे पालक यांचा या ॲपमध्ये समावेश करावा, अशा मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
तसेच तातडीने करावयाच्या उपाययोजना देखील ठळकपणे नमूद केल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे: ही नियमावली दहा दिवसांत तातडीने तयार करण्यात यावी. यामध्ये शहरी भाग, छोटी शहरे, ग्रामीण भाग, या परिसरातील शैक्षणिक संस्थांचा अभ्यास करून सर्वसमावेशक अशी नियमावली तयार करावी. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी मोबाईल ॲप तयार करावे.
संबंधित महाविद्यालयांचे प्रमुख, विद्यार्थी- विद्यार्थिनी, त्यांचे पालक यांचा या ॲपमध्ये समावेश करावा. अनेकवेळा महिला किंवा मुली तक्रारीसाठी धाडसाने पुढे येत नाही. यासाठी वसतिगृह स्तरावर संवाद समिती सुद्धा गठित करावी.