Crime News : नापास होण्याच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime 10th student commits suicide due to fear of failure exam mumbai police

Crime News : नापास होण्याच्या भीतीने दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

मुंबई : दहावीच्या परीक्षेतील काही विषयांचे पेपर कठीण गेल्यामुळे तणावाखाली आलेल्या 15 वर्षीय मुलाने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री चेंबूर परिसरात घडली.

नापास होण्याच्या भीतीने या मुलाने आत्महत्या केल्याची माहिती मिळत आहे. अनिकेत ठोंबे असे या मुलाचे नाव असून तो चेंबूरच्या विजय नगर परिसरात राहात होता. चेंबूर पोलिसांनी याबाबत अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

सध्या दहावीची परीक्षा सुरू असल्याने अनिकेतला काही पेपर कठीण गेले होते. त्यामुळे त्याला नापास होण्याची भीती होती. परिणामी, काही दिवसांपासून तो तणावाखाली होता. गुरुवारी रात्री त्याची आई घराबाहेर गेली होती.

त्यावेळी अनिकेतने घरात गळफास लावून आत्महत्या केली. काही वेळानंतर आई घरी परतली. यावेळी घर आतून बंद असल्याने तिने अनिकेतला हाक मारली. मात्र त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. यावेळी अनिकेत गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

टॅग्स :Mumbai Newscrimeexam