पोलिसांना धमकी देणाऱ्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या वडीवेल देवेंद्र याच्या अटकेनंतर घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला विरोध केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी त्याच्या पत्नीसह चौघांना अटक केली.

मुंबई - नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या वडीवेल देवेंद्र याच्या अटकेनंतर घराची झडती घेण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाला विरोध केल्याप्रकरणी जुहू पोलिसांनी त्याच्या पत्नीसह चौघांना अटक केली.

मुस्कान देवेंद्र (वय 20), चलमुत्तु देवेंद्र (वय 36), बानू देवेंद्र (वय 33) आणि रामाई देवेंद्र (वय 55) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यात आरोपीचा भाऊ, वहिनी आणि आईचा समावेश आहे. आरोपींनी हातात लोखंडी रॉड आणि बांबू घेऊन पोलिसांना धमकी दिली. तसेच, घरात प्रवेश केल्यास हल्ला करण्याची धमकी दिली. त्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

Web Title: Crime