खंडणीप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

नवी मुंबई - वाशीतील सत्रा प्लाझा इमारतीमधील इन्फिनिटी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाकडे ९२ लाख ५० हजारांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या संजय आणि हर्षदा घरत या दाम्पत्यावर एपीएमसी ठाण्याच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अद्याप अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.  

अजित कांडपिळे यांची इन्फिनिटी बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स ही कंपनी आहे. बिमला जिंदाल हे त्यांचे भागीदार आहेत. या कंपनीचे द्रोणागिरी सेक्‍टर-५५ मधील प्लॉट नंबर ७९ येथे इन्फिनिटी एलाईट या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. गेल्या आठवड्यात गुरुवारी दुपारी उरणमधील संजय घरत व त्याची पत्नी हर्षदा यांनी हे बांधकाम सुरू ठेवण्यासाठी पैशांची मागणी करून धमकावले त्यामुळे कांडपिळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Crime against the accused in the ransom case

टॅग्स