मोटरसायकलची डिक्की फोडून एक लाख लांबवले 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 जून 2018

पोलिस चौकीशेजारी मोटरसायकल उभी करून बाजारपेठेत ताडपत्रीची खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या मोटरसायकलची डिक्की फोडून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपयांची रक्कम लंपास केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

भिवंडी  : पोलिस चौकीशेजारी मोटरसायकल उभी करून बाजारपेठेत ताडपत्रीची खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या मोटरसायकलची डिक्की फोडून अज्ञात चोरट्याने एक लाख रुपयांची रक्कम लंपास केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गणेश काशिनाथ केणे (वय 44, रा. भावाळे) हे भिवंडीतील बाजारपेठेत पावसाळा तोंडावर आल्याने घराच्या छपरावर टाकण्यासाठी ताडपत्री खरेदी करावयाची असल्याने आले होते. त्यांनी आपली मोटरसायकल बाजारातील तीनबत्ती येथील पोलिस चौकीजवळ पार्क करून ठेवली होती. त्यांना मार्केटमध्ये ताडपत्री पसंत न आल्याने ते घरी येण्यासाठी निघाले असता, त्यांना डिक्की फोडल्याचे लक्षात आले. डिक्की तपासून बघितली असता, प्लास्टिकच्या पिशवीत असलेली एक लाखाची रक्कम व पत्नी आणि त्याच्या नावे असलेले पारसिक बॅंकेचे दोन पासबुक गायब असल्याचे दिसून आले. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत पोलिस ठाण्यात धाव घेऊन झालेल्या चोरीप्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भुट्टू पवार करीत आहे. 

Web Title: crime in bhivandi

टॅग्स