नोकरीच्या प्रलोभनातून गंडा घालणारे कोठडीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

मुंबई - परदेशी नोकरीची सोशल मीडियावर जाहिरातबाजी करून बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. स्नेहा नरेंद्र पंचारिया, अजय भवानीशंकर गुप्ता, सॅडरिक डॉकनिक रॉबर्ट, विग्नेश सुरेश. के. सी अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी राज्यभरात अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. हे चौघे आरोपी पोलिस कोठडीत आहेत. 

याप्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाने तक्रार दिली. ते कांदिवली परिसरात राहतात. पूर्वी त्यांनी काही वर्षे आखाती देशात नोकरी केली होती; मात्र वयोमानामुळे त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. सध्या पैशांची गरज असल्याने ते आखाती देशातील नोकरीच्या शोधात होते. फेसबुकवरील एका जाहिरातीतील क्रमांकावर फोन करून त्यांनी नोकरीबाबत चौकशी केली. त्या वेळी आपण कॅनडा येथे वरिष्ठ पदावर असून, तेथे नोकरी मिळवून देतो, अशी भूलथाप तक्रारदाराला दिली. त्याच्या सांगण्यानुसार तक्रारदाराने विमान तिकिट, व्हिसा आणि नोकरीकरता संशयिताच्या बॅंक खात्यात दीड लाख जमा केले. मात्र, दिलेल्या मुदतीत नोकरी आणि रक्कम परत न मिळाल्याने त्याने कांदिवली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्याची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याचा समांतर तपास गुन्हे शाखेचे पोलिस करत होते. प्रभारी पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकाने गोरेगाव येथून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कागदपत्रे आणि मोबाईल जप्त करण्यात आले. त्याच्या चौकशीत इतर तिघांची नावे उघड झाली. त्यानुसार त्यांना बेंगळूरुमधून ताब्यात घेण्यात आले. 

या टोळीने महाराष्ट्रासह पंजाब, तमीळनाडू राज्यातील तरुणांचीही फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पैसे मिळाल्यानंतर ही टोळी संबधितांशी संपर्क तोडून टाकायची, असे तपास स्पष्ट झाले. 

Web Title: The crime branch has unearthed unemployed people by advertising with social media