मुलीच्या अपहरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

मुंबई : पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा तपास स्थानिक पोलिसांऐवजी पुणे गुन्हे शाखेचे पोलिस करतील, अशी माहिती पुणे सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात दिली.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्याची पोलिस उपायुक्तांमार्फत चौकशी केली जाणार असून, त्यात तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यावर खंडपीठाने 5 जूनपर्यंत पुणे पोलिसांना तपासाच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

सहा एप्रिलपासून बेपत्ता असलेल्या मुलीच्या तपासात हलगर्जीपणा होत असून, पोलिसांकडून आरोपीला मदत होत असल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर खंडपीठाने नाराजी व्यक्त करत याप्रकरणी सहपोलिस आयुक्तांना शनिवारी हजर राहण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार पुणे पोलिसांच्या वतीने सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम हे न्या. शाहरूख काथावाला आणि न्या. अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर शनिवारी हजर झाले. 

अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न करताना या प्रकरणाचा तपास पुणे गुन्हे शाखेकडे (क्राइम ब्रॅंच) वर्ग केला असून, दोन आठवड्यांत गुन्ह्याचा छडा लावण्यास यश मिळेल, असा विश्‍वास कदम यांनी व्यक्त केला.

Web Title: Crime Branch to look into the minor abduction case in Pune