'फोर्स 2' लिक झाल्याने पोलिसांत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जानेवारी 2017

मुंबई - अभिनेता जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा यांचा "फोर्स-2' हा चित्रपट इंटरनेटवर "लिक' झाल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने गुन्हा नोंदवला आहे. चित्रपटाची निर्माती "वियाकॉम 18' या कंपनीने याबाबत काही दिवसांपूर्वी तक्रार केली होती. त्यानुसार प्राथमिक तपास करून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

18 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. दुसऱ्याच दिवशी संपूर्ण चित्रपट इंटरनेटवर लिक झाला होता. तक्रारीत एका वितरक कंपनीबद्दल संशय व्यक्त करण्यात आला आहे. आमच्या हाती काही तांत्रिक पुरावे लागले असून, तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. यापूर्वी "मांझी', "ग्रेट ग्रॅण्ड मस्ती' यांसारख्या चित्रपटांच्या प्रतीही इंटरनेटवर बेकायदा टाकण्यात आल्या होत्या. या प्रकरणी काही जण पोलिसांच्या रडारवर असून, त्यांची लवकरच चौकशी केली जाणार आहे. चित्रपटाची प्रत इंटरनेटवर उपलब्ध झाल्यामुळे निर्माती कंपनी "वियाकॉम'ने तक्रार केली होती

.

Web Title: crime by force-2 movie leake