Crime News : रुग्णालय सुरु करण्याच्या बहाण्याने 56 लाखाची फसवणूक

मानपाडा पोलिस ठाण्यात कल्पना भौमिक, भिमकुमार साव उर्फ अमित सावरा आणि निलेश कळसाईत यांच्याविरोधात तक्रार दाखल
Crime Fraud of 56 lakhs on pretext of starting hospital mumbai police
Crime Fraud of 56 lakhs on pretext of starting hospital mumbai policeesakal

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी परिसरात अंजली रुग्णालय चालू करत असल्याचे सागंत तिघा भामट्यांनी मेडिकल व्यावसायिकासह गुंतवणूक दारांची तब्बल 56 लाखाला फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात कल्पना भौमिक, भिमकुमार साव उर्फ अमित सावरा आणि निलेश कळसाईत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई येथे राहणारे मेडिकल व्यावसायिक वग्ताराम भाटी (वय 43) यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार जानेवारी ते मे 2021 या कालावधीत ही फसवणूक झाली आहे.

तिघा भामट्यांनी आपसात संगनमत करत वग्ताराम यांना कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी येथे अंजली हॉस्पिटल सुरु करावयाचा असल्याचा देखावा करुन तेथे मेडिकल दुकान चालू करण्यासाठी वग्ताराम व त्यांचे पार्टनर धनाराम सोळंकी यांच्याकडून 30 लाख रुपयांची डिपॉझिट रक्कम चेकद्वारे व 2 लाख रुपये हॉस्पिटलचे साहित्य खरेदी करण्यासाठी घेतले.

तसेच साक्षीदार समिधा पालव व त्यांचे आरोग्य हेल्थ केअर कंपनीचे पार्टनर यांच्याकडून अंजली हॉस्पिटलमध्ये लॅब सुरु करम्यासाठी डिपॉझिट म्हणून 24 लाख रुपये घेतले. दोन वर्षानंतर अंजली हॉस्पिटल चालत नसल्याचे कारण देत हॉस्पिटल बंद केल्याचे भासविले. गुंतवणूक दारांचे पैसे सहा महिन्यात परत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

परंतू वर्षाचा कालावधी उलटला तरी पैसे परत देत नसल्याने गुंतवणूकदारांनी मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. वग्ताराम यांच्या तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला असून याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक डी.ए.सुर्यवंशी हे करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com