डहाणू, तलासरी बीडीओंविरुद्ध गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल डहाणूचे गटविकास अधिकारी (बीडीओ) बी. एच. भारक्षे व तलासरीचे गटविकास अधिकारी बी. व्ही. नाळे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 134 मधील तरतुदींन्वये डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
 

पालघर - पालघर लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल डहाणूचे गटविकास अधिकारी (बीडीओ) बी. एच. भारक्षे व तलासरीचे गटविकास अधिकारी बी. व्ही. नाळे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1951 च्या कलम 134 मधील तरतुदींन्वये डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप सेंटमेरी हायस्कूल येथील निवडणूक मध्यवर्ती कार्यालयात उपस्थित राहून कामाला सुरुवात केलेली नाही. याबाबत वेळोवेळी नोटिसा देण्यात आल्या; परंतु त्या नोटिसांनाही जुमानले नाही. त्यामुळे नायब तहसीलदार समद शेख यांनी दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. 

Web Title: crime a gainst dahanu BDO