कपिल शर्माविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

मुंबई - कॉमेडीकिंग कपिल शर्माच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. पर्यावरणाचे नुकसान केल्याप्रकरणी कपिल शर्माविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्सोवामधील ऑफिससाठी खारफुटी नष्ट केल्याचा आरोप कपिल शर्मावर आहे.

सामाजिक कार्यकर्ते संतोष दोंडकर यांनी अंधेरी दंडाधिकाऱ्यांकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार दोंडकर व त्यांच्या वकील आभा सिंह यांनी कपिल शर्माविरुद्ध एन्व्हायरमेंट प्रोटेक्‍शन ऍक्‍ट आणि एमआरटीपीअंतर्गत गुन्हा दाखल केला. कपिल शर्माने 9 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर टॅग करत मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पाच लाखांची लाच मागितल्याची तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेने केलेल्या तपासात कपिलनेच अनधिकृत बांधकाम व पर्यावरणाचे नुकसान केल्याचे उघड झाले. कपिलने त्या लाचखोराचे नाव सांगितले नाही. त्यामुळे कपिलविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. याप्रकरणी एक ते सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असे आभा सिंह यांनी सांगितले. फक्त कपिलच नाही तर या प्रकरणात सहभागी असलेल्या सगळ्यांवर कारवाई व्हायला हवी, असा युक्तिवाद आभा सिंह यांनी केला होता. त्यावर अंधेरी दंडाधिकारी ए. ए. पंचभाई यांनी कपिलविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Web Title: crime on kapil sharma