Crime : अनैतिक संबंधाचा संशय! आधी पत्नीची हत्या, 5 वर्षांनी बाहेर येताच, तिच्या प्रियकारालाही संपवलं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

Crime : अनैतिक संबंधाचा संशय! आधी पत्नीची हत्या, 5 वर्षांनी बाहेर येताच, तिच्या प्रियकारालाही संपवलं

मुंबई : अनैतिक संबंधातून पत्नीचा खून केल्यानंतर पाच वर्षांनी प्रियकराचीही हत्या करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली आहे. या प्रकरणी जे जे मार्ग पोलिसांनी ब्रिजेश प्रसाद या आरोपी पतीला अटक केली आहे.

पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून 42 वर्षीय व्यक्तीची डोंगरात हत्या करण्यात आली होती. आरोपीला 2018 मध्ये त्याची पत्नी व मृत व्यक्तीचे अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने पत्नीची हत्या केली होती. त्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली होती. काही काळानंतर आरोपी तुरुंगातून बाहेर आला आणि आता त्याने पत्नीच्या प्रियकराचीही हत्या केली.

आरोपी ब्रीजेश प्रसाद मूळचा बिहारमधील खानेटू येथील रहिवासी आहे. मृत धर्मा नाडर हा ब्रीजेश प्रसाद याच्या हाताखाली सफाई कामगार म्हणून काम करीत होता. धर्मा व ब्रीजेशची पत्नी यांच्यात अनैतिक संबंध असल्याचे 2018 मध्ये आरोपीला कळाले. त्यावेळी आरोपीने पत्नीची हत्या केली.

त्याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्यावेळी ब्रीजेशने धर्माचाही खून करण्याची धमकी दिली होती. या प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर बुधवारी ब्रीजेशने डोंगरी इमामवाडा येथे चाकूने भोसकून धर्माची हत्या केली. या प्रकरणानंतर जे.जे. मार्ग पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.