चारित्र्याच्या संशयावरून उकळत्या तेलात बुडवायला लावला हात; भाजपकडून कठोर कारवाईची मागणी

चारित्र्याच्या संशयावरून उकळत्या तेलात बुडवायला लावला हात; भाजपकडून कठोर कारवाईची मागणी

मुंबई - नाशिकमध्ये महिलेच्या चारित्र्याच्या संशयावरून तिला उकळत्या तेलात हात बुडवून अग्नीपरिक्षा द्यायला लावणाऱ्या जातपंचायतीच्या कृत्याबाबत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून पुरोगामी महाराष्ट्रासाठी शोभादायक नाही. गेल्या महिन्यात पुणे जिल्ह्यातील एका जातपंचायतीने एका महिलेच्या बाबतीत असाच प्रकार केला होता. त्यावेळी फक्त भारतीय जनता पक्षानेच निषेध करत कडक कारवाई करण्यास भाग पाडले होते. आताही सरकारकडून तसेच पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाईची अपेक्षा असल्याचे दरेकर यांनी म्हटले आहे. 

जातपंचायतींवर नियंत्रण ठेवण्यासंदर्भात अस्तित्वात असलेल्या कायद्याची सरकारने कठोर अंमलबजावणी करावीच. पण असे प्रकार रोखण्यासाठी त्या कायद्यात काही तृटी असल्यास त्या दूर करून तो कायदा आणखी कठोर करण्यासाठीही सरकारने पावले उचलावीत. त्यासंदर्भात सरकारने अभ्यास करावा, अशीही मागणी दरेकर यांनी केली आहे. 

सरकारने यासंदर्भात कायदा करूनही हे प्रकार थांबले नाहीत. त्यामुळे प्रशासनाचा धाक कोणालाही नाही हेच दिसून येत आहे. राज्याच्या ग्रामीण भागात असे प्रकार वारंवार घडत आहेत. ते थांबविण्यासाठी सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, अन्यथा हे प्रकार वाढीस लागतील, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे.

---------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

crime marathi hand dipped boiling oil suspicion of character  BJP demands action politics updates

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com