औषध विक्रेत्या कंपन्यांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 फेब्रुवारी 2019

मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘मेडलाइफ’ या ऑनलाइन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषध विक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आठवड्यापूर्वी ‘एफडीए’च्या मुख्य कार्यालयाला भेट देत या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. ‘एफडीए’कडून मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

संरक्षण विभागाला पुरवली जाणारी ‘सिटाग्लिप्टीन फॉस्फेट’ आणि ‘विल्डाग्लिप्टीन’ या गोळ्या त्या विभागाच्या शिक्‍क्‍यांसह बाजारात बेकायदा उपलब्ध झाली होती. या औषधांच्या पाकिटांवर ‘ही औषधे संरक्षण विभाग व नौदलासाठी असून, विक्रीसाठी नाहीत,’ असे लिहिले होते; मात्र हा शिक्का व्हाइटनरद्वारे खोडून ही औषधे विकली जात होती. जानेवारी अखेरपासून मुंबईसह नवी मुंबई आणि भिवंडीतील विविध ठिकाणी ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी छापे घातले होते.

गुन्हे दाखल
तीन आठवड्यांच्या चौकशीनंतर तळोजा पोलिस ठाण्यात ‘मेडलाइफ’ या ऑनलाइन औषध विक्रेता कंपनीवर गुन्हा दाखल केला. ही औषधक्षेत्रातील अग्रगण्य कंपनी मानली जाते. तसेच, स्वामी समर्थ या दुकानासह मुलुंडमधील सेफलाइफ आणि भायखळ्यातील ‘निवान फार्मास्युटिकल्स’ या कंपन्यांविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली. संरक्षण, नौदलाच्या औषधांची खुलेआम बेकायदा विक्री करणाऱ्या एकूण १३ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आणखी काही संशयितांवर लवकरच गुन्हे दाखल होतील, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली.

Web Title: Crime on Medicine Sailing Company