बालकास मारहाण करणाऱ्या आईवर गुन्हा

पनवेल - मुलाच्या पाठीवर उठलेले मारहाणीचे वळ.
पनवेल - मुलाच्या पाठीवर उठलेले मारहाणीचे वळ.

नवीन पनवेल - साडेतीन वर्षांच्या बालकास पट्टा व लोखंडी चिमट्याने मारहाण करणाऱ्या आईवर कामोठे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला.

कामोठे येथील सेक्‍टर-१६ मधील त्रिमूर्ती सोसायटीत राहणाऱ्या ज्योती कुमारी नोकरी करतात. शनिवारी त्या आपल्या साडेतीन वर्षांच्या प्रिन्स या मुलाला बाजूच्या सोसायटीमधील पाळणाघरात सोडून कामावर गेल्या. त्या वेळी प्रिन्सच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. त्याचा चेहरा काळा निळा पडला. याबाबत मुलाच्या आईला विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत तो शिडीवरून पडल्याचे सांगितले. मुलाच्या आईच्या बोलण्यावर संशय आल्याने मुलाला विचारले असता, आईने व काकाने मला पट्ट्याने व चिमट्याने मारहाण केल्याचे सांगितले. यानंतर उदय रामजित सिंग याला अटक करण्यात आली असून, मुलाची आई ४ महिन्यांची गर्भवती असल्याने तिला चौकशी करून सोडण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com