पत्नीचा छळ करणाऱ्या पोलिसाविरोधात गुन्हा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 14 डिसेंबर 2016

मुंबई - मारहाण करून पत्नीचा छळ करणारा पोलिस शिपाई अनिल चव्हाण आणि त्याच्या कुटुंबाविरोधात ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विवाहित मुलीला स्वत:च्या 18 महिन्यांच्या मुलीसह वाऱ्यावर सोडणाऱ्या जावयाला अटक करावी, त्याला त्वरित निलंबित करावे, अशी मागणी मुलीचे वडील बाळकृष्ण कांबळे यांनी केली आहे.

लोअर परळ येथील गणपतराव कदम मार्गावरील आर. आर. ठाकूर चाळीत राहणाऱ्या अनिल चव्हाण याच्याबरोबर योगिताचे 2 मे 2014 रोजी लग्न झाले होते, या दाम्पत्याला 18 महिन्यांची मुलगी आहे. एकत्र कुटुंबात राहत असताना सुरवातीला काही दिवस चांगले गेले. नंतर माहेरहून पैसे आण, असा तगादा योगितामागे लावण्यात आला. लग्नाच्या वेळचे मंगळसूत्र, अंगठी आदी दागिने काढून घेण्यात आले. बाळंतपणाचा खर्च वडिलांनी केला असतानाही बिले सादर करून पतीने पोलिस खात्यातूनही ते पैसे मिळवले, असा आरोप योगिताने तक्रारीत केला आहे. सध्या योगिता विक्रोळीला वडिलांच्या घरी राहते.

आग्रीपाडा पोलिस ठाण्यात काम करणाऱ्या अनिलला वरिष्ठ पोलिसांनी समजावून कौटुंबिक सौख्य राखण्याचा सल्ला दिला होता; मात्र ते प्रयत्न निष्फळ ठरले. तिच्या पतीच्या सर्व दुष्कृत्यांना साथ देणारा दीर सुनील चव्हाण आणि जाऊ अमिता चव्हाण, मामी संगीता चव्हाण यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: crime in mumbai