महिलांना अश्‍लील संदेश पाठवणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

मुंबई - दादरमधील ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या पाच महिलांना व्हॉट्‌सऍपवरून अश्‍लील संदेश आणि छायाचित्र पाठवणाऱ्या सुरेश चाफे (वय 34) याला शिवाजी पार्क पोलिसांनी शुक्रवारी (ता. 7) कळव्यात अटक केली. तीन महिन्यांपासून तो वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून महिलांना अश्‍लील संदेश पाठवत होता.

ब्यूटी पार्लरमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला अनोळखी क्रमांकावरून अश्‍लील संदेश व्हॉट्‌सऍपवर आला होता. क्रमांक कोणाचा आहे, हे पाहण्यासाठी तिने संबंधिताचे प्रोफाईल चित्र पाहिले असता, तिथे अश्‍लील छायाचित्र दिसले. नंतर दुसऱ्या क्रमांकावरून तिला तशा प्रकारचे संदेश आणि छायाचित्रे येण्यास सुरवात झाली. ब्यूटी पार्लरमधील इतर चौघींनाही असे संदेश येत असल्याचे उघडकीस आले. महिलांनी याप्रकरणी शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली. वेगवेगळ्या क्रमांकांपैकी एक मोबाईल क्रमांक कळव्यातील सुरेश चाफे याचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. शुक्रवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

Web Title: crime in mumbai