Crime News : चहा नाश्ताचे हॉटेल चालकाने पैसे मागितले; ग्राहकाने केले चाकूने वार

मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
crime mumbai police hotel owner ask money for tea and breakfast customer stab
crime mumbai police hotel owner ask money for tea and breakfast customer stab esakal

डोंबिवली - चहा नाश्ताचे उधारीचे पैसे मागितल्याने संतापलेल्या ग्राहकाने हॉटेल चालकावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीतील गोळवली परिसरात घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात मनोजकुमार यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime mumbai police hotel owner ask money for tea and breakfast customer stab
Jalgaon Crime News: प्रियकराच्या नादात पतीच्या घरात टाकला डाका; सोन अन् लाखोंची रोकड घेऊन पत्नी फुर्रर्र

डोंबिवली पूर्वेतील पांडुरंग वाडी परिसरात राजेंद्र प्रसाद यादव यांचे दुध डेअरी व स्नॅक्सचे हॉटेल आहे. याच परिसरात राहणारा मनोज कुमार यादव हा राजेंद्र यांच्या हॉटेलवर यायचा आणि उधारीवर चहा नाश्ता करुन जायचा. दोन दिवसांपूर्वी मनोज हा हॉटेल समोरुन जाताना राजेंद्र यांना दिसला त्यांनी त्याच्याकडे नाश्त्याचे उधारीचे पैसे मागितले.

crime mumbai police hotel owner ask money for tea and breakfast customer stab
Dhule Crime News : धुळ्यात लुटीसह पोलिसांवर हल्ला; दोघे अटकेत

उधारीचे पैसे मागितल्याने मनोज याला राजेंद्र याचा राग आला. मनोजने राजेंद्र यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण केली. स्वतःजवळील चाकूने मनोजने राजेंद्र यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात राजेंद्र हे जखमी झाले ्सून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चाकूने हल्ला केल्यानंतर मनोज याने तेथून पळ काढला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com