Crime News : इंटरनेटवर जेवण शोधणं पडलं महागात; हजारो रुपयांना गंडा; आरोपी अटकेत

मुंबईच्या ग्रँड रोड भागात राहणाऱ्या एका रहिवाशाला एसएमएसद्वारे फ्रॉड लिंक पाठवून सायबर ठगांनी 89 हजार रुपयांची फसवणूक
crime news mumbai cyber 89 thousand rupees fraud police arrested two
crime news mumbai cyber 89 thousand rupees fraud police arrested two esakal

मुंबई : मुंबईच्या ग्रँड रोड भागात राहणाऱ्या एका रहिवाशाला एसएमएसद्वारे फ्रॉड लिंक पाठवून सायबर ठगांनी 89 हजार रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी सायबर ठगांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नागेश्वर मालो ठाकूर आणि संतोष कुमार भालदेव मंडल या दोघांना अटक केली आहे. हे दोघे झारखंडमधील दुमका गावचे रहिवासी आहेत.

ऑनलाईन जेवणाचा शोध

फसवणुकीची घटना या वर्षी 5 जानेवारीची आहे. या प्रकरणात पिडीत तक्रारदार इंटरनेटवर जेवणाच्या डब्याची सेवा पुरवणाऱ्याचे पर्याय शोधत होता. इंटरनेटवर त्याला एक नंबर मिळाला. त्यानंतर पिडीताने त्या नंबरवर संपर्क केला. त्यावेळी पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने एक लिंक पाठवली आणि सांगितलं की, तुम्हाला आधी या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. तसेच त्याला 5 रुपये शुल्क भरण्यास सांगितले

लिंकवर क्लिक महागात

पिडीत तक्रारदाराने त्याला फोनवर जे काही सांगण्यात आलं, त्या सर्व गोष्टी त्याने केल्या. तसेच 5 रुपयांचं ऑनलाईन शुल्कही दिलं. काही वेळाने त्याला मेसेज आला, त्यात लिहिलं होतं की, “तुमची ऑर्डर रद्द झाली आहे”. तसेच त्याला त्याच नंबरवरून आणखी एका लिंकचा मेसेज आला. त्यावर क्लिक केल्यानंतर काहीच मिनिटात पिडीत व्यक्तीच्या बँक खात्यातून 89 हजार रुपये वजा झाल्याचा मेसेज त्याला आला. त्यानंतर पिडीत व्यक्तीला आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आले

बँक अकाऊंटद्वारे आरोपींना शोधलं

सायबर ठगांनी आपल्याला गंडा घातल्याचे लक्षात येताच पिडीत व्यक्तीने लगेच गावदेवी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी सायबर पोलिसांच्या पथकासह गावदेवी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. सायबर टीमने ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले होते आणि ज्या मोबाईल नंबरवरून त्यांनी पीडित व्यक्तीशी संपर्क साधला होता त्याची माहिती मिळवली. या माहितीच्या आधारे त्यांना आरोपींचा माग काढण्यात यश आलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नागेश्वर मालो ठाकूर आणि संतोष कुमार भालदेव मंडल या दोघांना अटक केली आहे. हे दोघे झारखंडमधील दुमका गावचे रहिवासी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com