पिस्तुलाच्या आकारातील लायटरचा वापर करून दुकानदाराला लुटले

पिस्तुलाच्या आकारातील लायटरचा वापर करून दुकानदाराला लुटले

मुंबई  : सिगारेट शिलगावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिस्तुलाच्या आकारातील लायटरचा वापर करून एकाने दुकानातून 85 हजार रुपयांचा मोबाइल चोरी केल्याची घटना अंधेरीत घडली. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका व्यायाम प्रशिक्षकाला अटक केली आहे. दानिश जमिल खान (वय23) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दानिशचे वडिल चित्रपट सहदिग्दर्शक म्हणून काम करतात. गेले अनेक दिवस दानिश आयफोन वापरत होता. तो जुना झाल्याने आणि तितक्‍याच किमतीचा मोबाइल विकत घेणे परवडणारे नसल्याने त्याने काहीतरी शकल लढवण्याचे ठरवले. यासाठी त्याने घरात ठेवलेल्या पिस्तुलाच्या आकारातील लायटर उचलले आणि तो मोबाइलच्या दुकानात शिरला. 

त्यानुसार गुरुवारी सायंकाळी मोबाइल खरेदीच्या बहाण्याने महागड्या मोबाइलच्या दुकानात शिरला. त्यानंतर काही क्षणांत त्याने दुकानदारावर बनावट पिस्तुल रोखले. या साऱ्या प्रकाराने दुकानदार आधी भयभीत झाला. तसे दानिशने त्याच्याकडे महागड्या मोबाइलची मागणी केली. त्यावर दुकानदाराने मोबाइल दानिशच्या हाती सोपविला. तो घेऊन दानिशने तेथून पळ काढला. 

या साऱ्या प्रकारानंतर दुकानदाराने तातडीने ओशिवरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवून दुकानातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले आणि आरोपीची ओळख पटवली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ओशिवरा पोलिसांनी दानिशला अटक केली. या प्रकरणी त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

crime news mumbai Robbed the shopkeeper using a pistol-shaped lighter

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com